भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ती। न धरावी चित्तीं साधकांनी

sarvasva budati aisi je matokti| na dharavi chittin sadhakanni

रचनाकार: संत रामदास · अभंग
सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ती। न धरावी चित्तीं साधकांनी ।। भरत तो मूर्ख काय होतां सांग। मातेचा तो त्याग। केला जेणें ।। पित्याने त्यागिलें। दैत्येद्रें प्रल्हादें । कां त्यासी गोविंदें स्नेह केला ।। दैत्य बिभीषणें टाकीयेला बंधु । रामासी संबंधु। जोडियेला ।। रामदास म्हणे। शुक्र होतां गुरू । परंतु दातारु। धन्य। बळी ।।