भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वभावें तूतें जे ध्याती दातारा । त्यांचिया संसारा तूंचि होसी

sarvabhaven tuten je dhyati datara | tyanchiya sansara tunchi hosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वभावें तूतें जे ध्याती दातारा । त्यांचिया संसारा तूंचि होसी ॥१॥ ज्याचे चित्तीं नाहीं आणिक कांहीं काम । त्याचा योगक्षेम तूंचि होसी ॥२॥ ऐहिक परत्र जें कांहीं देखिजे । तें तुवां होईजे मायबापा ॥३॥ नामा म्हणे माझी भक्ति हे माउली । केशवा वाहिली क्षणमात्रें ॥४॥