भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व पाप पुण्य हींचि दोन्ही भांडीं । विवेक न सांडीं येतां जातां

sarva pap punya hinchi donhi bhandin | vivek na sandin yetan jatan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्व पाप पुण्य हींचि दोन्ही भांडीं । विवेक न सांडीं येतां जातां ॥१॥ तुझें नाम तारूं तुझें नाम तारूं । तुझें नाम तारूं श्रीविठ्ठल ॥२॥ विष्णुदास नाम्यानें उभारिली शिडी । ठाकावया पेढी वैकुंठींची ॥३॥