भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वा कालीं परमात्मा आहे सर्व देशीं । भावना हे अहर्निशीं दृढ धरी

sarva kalin paramatma ahe sarva deshin | bhavana he aharnishin drudh dhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वा कालीं परमात्मा आहे सर्व देशीं । भावना हे अहर्निशीं दृढ धरी ॥१॥ संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जाये तेथें तेथें लोटांगणीं ॥२॥ चिंताअ न करी नाम्या येणें तरसी जाण । तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥३॥