भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व देवांमाजी विठ्ठल वरिष्ट । बोलतसे स्पष्ट वेद- शास्त्रीं

sarva devammaji viththal varishta | bolatase spashta ved- shastrin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्व देवांमाजी विठ्ठल वरिष्ट । बोलतसे स्पष्ट वेद- शास्त्रीं ॥१॥ अच्युता अनंता माधवा मुकुंदा । गोपाळा गोविंदा गोपवेषा ॥२॥ कृष्णा कमलाक्षा कस्तुरीचा टिळा । नेसला पाटोळा खोंचे शिरीं ॥३॥ नामा म्हणे रामकृष्ण नारायण । तारिसी पाषाणां सिंधूमाजी ॥४॥