भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरोवरीं कमळें तैसे तुझे नेत्र । त्याहूनि विचित्र दिस-ताती

sarovarin kamalen taise tujhe netra | tyahuni vichitra dis-tati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सरोवरीं कमळें तैसे तुझे नेत्र । त्याहूनि विचित्र दिस-ताती ॥१॥ कृपाळुवा ऐकें अगा ह्लषिकेशी । आह्मी तुझ्या दासी मोलविण ॥२॥ कामरूपदैत्य मारितो आह्मांसी । भक्तांसी रक्षिसी कीर्ति जगीं ॥३॥ दीनासी रक्षिसी दुष्टांसी मारिसी । धर्माला स्थापिसी निरंतर ॥४॥ घेवोनियां शस्त्र मारावें सकळां । आलासे कंटाळा नामा ह्मणे ॥५॥