भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारथ्यासीं सांगे हांकीं हा रथवर । पाहियेलें तीर यमुनेचें

sarathyasin sange hankin ha rathavar | pahiyelen tir yamunechen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सारथ्यासीं सांगे हांकीं हा रथवर । पाहियेलें तीर यमुनेचें ॥१॥ उभा राहोनियां पाहे चहूंकडे । बोलताती कोडें पक्षी-राज ॥२॥ व्याघ्र आणि गायी एकत्र बैसती । कोळिका बोलती कृष्ण कृष्ण ॥३॥ सर्प आणि नाग निस्तेज पडती । चिमण्या बो-लती कृष्ण कृष्ण ॥४॥ वियोगानें तेव्हां मयूरें रडती । शुक डोल-ताती कृष्ण कृष्ण ॥५॥ कृष्णाच्या कृपेनें कळलें उद्धवासी । धन्य धन्य त्यांसी ह्मणे तेव्हां ॥६॥ ब्रह्मज्ञान सांगों देवें पाठविला । तो रडूं लागला तयेवेळी ॥७॥ नामा ह्मणे आला नंदाचिया घरा । पुढलें अवधारा निरोपण ॥८॥