भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतों काकुलती तुजलार्गीं

sarasvati mate dyavi maj sphurti | yeton kakulati tujalargin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतों काकुलती तुजलार्गीं ॥१॥ लाडकें लडिवाळ मागतसें तूज । वंदीन हे रज चरणींचे ॥२॥ त्वरें येवोनिय मस्तकीं ठेवीं हात । जाईल ही आंत तेव्हां माझी ॥३॥ आपुल्या बाळासी धरी आतां हातीं । न करीं फजितीं जनामध्यें ॥४॥ विश्वात्मा जो हरि त्याची वर्णीन कीर्ति । आवडीचा ओतीं रस यातें ॥५॥ ऐकोनियां स्तव झालीसे प्रसन्न । नाम्या तुझा अभिमान मजलागीं ॥६॥