भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळी ते मूर्ति ह्रदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची

sanvali te murti hradayin bimbali | deho buddhi palatali majhi sachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सांवळी ते मूर्ति ह्रदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥ धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥ आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥ नामयाचे जनी विश्रांति पैं झाली । ह्रदयीं राहिली विठ्ठलमूर्ती ॥४॥