भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांसी विन्मुख जालासी गव्हारा । नाहीं आतां थारा इहपरलोकीं

santansi vinmukh jalasi gavhara | nahin atan thara ihaparalokin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संतांसी विन्मुख जालासी गव्हारा । नाहीं आतां थारा इहपरलोकीं ॥१॥ नाहीं वेडया संतांचा अंगवळा । झोंप बैसली डोळां अज्ञानाची ॥२॥ भ्रांतीनें तुझी पुरविली पाठी । सज्जनाच्या गोष्टी कडू जाल्या ॥३॥ हाता आला लाभ गमाविला सारा । भुललासी गव्हारा भ्रमभूली ॥४॥ मोह सर्पें तुझें व्यापियेलें अंग । म्हणे पांडुरंग काय आतां ॥५॥