भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांची विश्रांति ज्ञानियांचें गूज । मुक्तिचें हें बीज मोक्षदानीं

santanchi vishranti dnyaniyanchen guj | muktichen hen bij mokshadanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संतांची विश्रांति ज्ञानियांचें गूज । मुक्तिचें हें बीज मोक्षदानीं ॥१॥ कृष्णा विष्णु हरी मुकुंद मुरारी । अच्युता नरहरी नारायण ॥२॥ गोवर्धनधर गोपी मनोहर । भक्त करुणाकर पांडु-रंगा ॥३॥ तूंचि हें सकळ आदि मध्य अंतीं । निज सुख संपत्ति सज्जनांची ॥४॥ सकळ नारायण पातक भंजन । हरि जगज्जीवन परमानंद ॥५॥ तूंचि माझा श्रोता तूंचि माझा वक्ता । तूंचि घेता देता प्रेमसुख ॥६॥ नामदेव ऐसेम नाम त्वां ठेविलें । येणें अनुभ-विलें प्रेम सुख ॥७॥ विष्णुदास नामा विनवि पुरुषोत्तमा । सोडवीं भवभ्रमा पासोनियां ॥८॥