भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत ते कवन असंत ते कोण । सांगावी हे खूण दोही माजी । देवा तुजकारणें ऐसें झालें

sant te kavan asant te kon | sangavi he khun dohi maji | deva tujakaranen aisen jhalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संत ते कवन असंत ते कोण । सांगावी हे खूण दोही माजी । देवा तुजकारणें ऐसें झालें ॥१॥ पैल संत म्हणोनि जवळी गेलें । तेणें अमृत म्हणोनि विष पाजिलें । जीवासि घेतलें जालें तैसें ॥२॥ संसारेम गांजिलें गुरु गिरवसितीं । भगवे देखोनि तारावें ह्मणती । तंव ते नेणोनि उपदेशाची रीति । कुकर्मी घालिती तैसेम झालें ॥३॥ कोणी एक प्राणी सागरा पातले । पैल तारूं म्हणोनि जवळी गेले । तंव तारूं नव्हेती तेथिंचे हेर । बुडविती शरीर तैसें झालें ॥४॥ कोणी प्राणी हिंवें पीडिलें । पैम झाडी म्हणोनि जवळी गेलें । तंव अस्वल खिंखाळत उठिलें । नाक कान तोडिलेम तैसें झालें ॥५॥ कोणी एक अंधारी पडिला प्राणी । जवळी गेला पैल दीप म्हणोनि । दीप नव्हे सर्प माथींचा मणि । डंखिला प्राणि तैसें झालें ॥६॥ केशव म्हणे नामयातें । जे सर्वांभूर्ती भजती मातें । ऐसें हें वर्म सांगतसे तूतें । ऐसिया संतांतें म्हणिजे संत ॥७॥