भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार करितां देव जैं सांपडे । तरि कां झाले वेडे सन-कादिक

sansar karitan dev jain sampade | tari kan jhale vede san-kadik

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसार करितां देव जैं सांपडे । तरि कां झाले वेडे सन-कादिक ॥१॥ संसारीं असतां जरी भेटता । शुकदेव कासया जाता तयालागीं ॥२॥ घराश्रमीं जरी जोडे परब्रम्ह । तरि कां घराश्रम त्याग केला ॥३॥ ज्ञातीच्या आचारें सांपडे जरी सार । तरि कां निरहंकार झाले साधु ॥४॥ नामा म्हणे आतां सकळ सांडोन । आलोंसे शरण विठोबासी ॥५॥