भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडूनि पंढरिची वारी । मोक्ष मागती ते भिकारी

sanduni pandharichi vari | moksha magati te bhikari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सांडूनि पंढरिची वारी । मोक्ष मागती ते भिकारी ॥१॥ ताट वोघरिलें निकें । सांडूनि कवण जाय भिके ॥२॥ जो नेणे नामगोडी । तोचि मुक्तितेम चरफडी ॥३॥ आह्मीम पंढरीचे लाटे । नवजों वैकुंठीचे वाटे ॥४॥ झणीं भ्याल गर्भवासा । नामा म्हणे विष्णुदासा ॥५॥