भजनी मालिका
← भजनांकडे परत

समुद्राचें पाणि मुंगी मुखांतूनी । काढाया लागोनि श्रम थोडे

samudrachen pani mungi mukhantuni | kadhaya lagoni shram thode

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समुद्राचें पाणि मुंगी मुखांतूनी । काढाया लागोनि श्रम थोडे ॥१॥ केशवाची भक्ति कठीण त्याहनि । वांयां दंभपणीं नोहे नोहे ॥२॥ आकाश अंगुळें नामप सुयेमान । भूमीचें वजन पालडेनि ॥३॥ नामा म्हणे वारा वळूं ये कदापि । केशवाचे रूपीं नव्हे बुद्धि ॥४॥