भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हांसती सकळ लाज कोणा

samarthachen bal panghare vakal | hansati sakal laj kona

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हांसती सकळ लाज कोणा ॥१॥ देव आप्त दैन्य उरे कैंचे बापा । आम्हांसि तूं कां पां विसरलासी ॥२॥ ऐसा तूं अविनाश त्रिभुवनिंचा राजा । नामा म्हणे माझा तूंचि स्वामी ॥३॥