भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधीशी शेज घातली मनोहर । बैसविले वर चांगदेव

samadhishi shej ghatali manohar | baisavile var changadev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समाधीशी शेज घातली मनोहर । बैसविले वर चांगदेव ॥१॥ आनंदानें टाळया पिटिति वैष्णवाभार । लाविती पदर डोळियासी ॥२॥ टाळ मृदंगाचा जाला झणत्कार । गेले योगेश्वर समाधीसी ॥३॥ सांडिलीं भूषणें भस्म आभरणें । जाले निमग्न परब्रह्मीं ॥४॥ झांकियेले नेत्र उन्मनीच्या संगें । निवृत्ति पांडुरंग ओसंडले ॥५॥ नामा म्हणे जाला समाधिस्थ योगेश्वर । निघाले बाहेर देवभक्त्त ॥६॥