भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधीच्या पाळी वैसलीं सकळीं । केला या गोपाळीं जयजयकार

samadhichya pali vaisalin sakalin | kela ya gopalin jayajayakar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समाधीच्या पाळी वैसलीं सकळीं । केला या गोपाळीं जयजयकार ॥१॥ निवृत्तीच्या संगें पुंडलिक पांडुरंग । सिद्ध जाले सांग समाधीसी ॥२॥ निवृत्तिदेवें वंदिलीं सकळांची पाउलें । तीर्थ तें घेतलें विठोबाचें ॥३॥ पताकांची छाया समाधीसी आली । उतरले खालीं निवृत्तिदेव ॥४॥ पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी । बैसले आसनावरी निवृत्तिराज ॥५॥ नामा म्हणे देवा काय पाहावें आतां । गेला पंढरिनाथा चिद्‌भानु तो ॥६॥