भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे

samadhi paripurna baisale dnyaneshvar | uthavile bhar vaishnavanche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१॥ आळंकापुरीं सव्य घेतली ते संतीं । दिली भागीरथी ज्ञानालागीं ॥२॥ भैरवापासुनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥ सैघं इंद्रायणी वाहाती मिळोनी । अखंड क्षणीं वोघ जाती ॥४॥ चालिलें विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण जाली म्हणती ॥५॥ तीर्थ महोत्साह जाला सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६॥ वैष्णवांचे भार निघाले बाहेर । केला जयजयकार सर्वत्रांनीं ॥७॥ पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव जाले ॥८॥ नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । जाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥९॥