भजनी मालिका
← भजनांकडे परत

सखियेहो आहेति उदंड वेडे

sakhiyeho aheti udand vede

रचनाकार: संत रामदास · अभंग
सखियेहो आहेति उदंड वेडे । ऐसे ते सज्जन थोडे तयाची संगति जोडे । परम भाग्यें सकळांचे अंतर जाणे । मीपणें हुंबरों नेणें ऐसियावरून । प्राणसांडण करुं साहती बोलणें उणें । न पुसतां सांगणें समचि देखणें उणें । अधिक नाहीं अभिमान नावडे । धांवती दीनांकडे तयांचे जे उकरडे । महाल त्यांचे आपपर नाही ज्यासी । पुसतां सांगती त्यासी ऐकतांचि भाविकांसी । पालट होये रामीरामदास। वास । पाहतो रात्रंदिस ऐसियाचा सौरस । देईं राघवा