भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळिकां तेव्हां देवें आश्वासिलें । इंद्रें हें मांडिलें विघ्न येथें

sakalikan tevhan deven ashvasilen | indren hen mandilen vighna yethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकळिकां तेव्हां देवें आश्वासिलें । इंद्रें हें मांडिलें विघ्न येथें ॥१॥ महेंद्राच रंक करीन क्षणांत । पाहें पुरुषार्थ दावीन मी ॥२॥ रक्षिणार यांसी आहें मी गोविंद । उतरीन मद तुझा आतां ॥३॥ शरणागता मारी ऐसा कोण थोर । मशक पामर पाहूं आतां ॥४॥ यासाठीं करीन सृष्टीचा उभारा । लागों नेदी वारा दु:खाचा मी ॥५॥ गोवर्धना तुम्ही चलारे सकळ । दावितों मी बळ इंद्रा आतां ॥६॥ उचलिला गिरी प्रथम अंगुळीं नामा म्हणे बळी बाप माझा ॥७॥