भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळिकां नकस्कार करुनी यादवरावो । सांगे जीवींचा भावो तयांप्रती

sakalikan nakaskar karuni yadavaravo | sange jivincha bhavo tayamprati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकळिकां नकस्कार करुनी यादवरावो । सांगे जीवींचा भावो तयांप्रती ॥१॥ तुमचे कृपादृष्टि करावें भोजन । येणें होईल संपूर्ण व्रतसिद्धी ॥२॥ हेचि आवडी आहे बहु माझ्या जीवीं । ते आजी गोसावी पूर्ण कीजे ॥३॥ क्षण एक बैसावें स्वस्थ अंतःकरणें । संकल्पिलें नारायणें तुळसीदळ ॥४॥ संतुष्ट मानसें यातें अंगिकारा । मग निजमंदिरा जावें स्वामी ॥५॥ आजि तुमचा लाभु जाला भाग्य योगें । नामयाच्या प्रसंगें घडली सेवा ॥६॥ तुम्ही ब्रह्मबीज ब्रह्मादिकां पूज्य । सांभाळिले मज कृपादृष्टी ॥७॥ मज निरालंबासी करोनी अवलंबन । निष्कामासी पूर्ण केलें काम ॥८॥ अकर्ता असंगु तुमचेनि कृतार्थ । जालों पैं यथार्थ वचन माझें ॥९॥ मग ते चतुर्विधा महामंत्रस्वरें । द्विज जयजयकार करिताती ॥१०॥ विजय सर्वकाळ व्हावें पुढतो पुढतीं । आशिर्वाद देती मंत्राक्षता ॥११॥ पितांबराचे अचळीं घेउनी मंत्राक्षता । घालितसे माथा नामयाच्या ॥१२॥ हेंचि तुझें प्रेम राहो हें चिरंतन । मुखीं नाम ध्यान ह्रदयी सदा ॥१३॥ तंव म्हणती धरामर तुम्ही श्रमलेति थोर । लागला उशीर भोजनांसी ॥१४॥ सर्वाम ठाईं तुम्ही सर्वच होउनी एक । कारण सार्थक केलें निकें ॥१५॥ स्वामीचा आदर सांगतां अभिनव । नम्रता गौरव निरुपम ॥१६॥ अकल्प आयुष्य चिरंजीव व्हावें । आम्हां सांभाळावेम पुढतापुढतीम ॥१७॥ आतां संतांचिया पंक्ती सारावें भोजन । करावेम परीपूर्ण जीवींचे कोड ॥१८॥ उच्छिष्ट प्रसाद द्यावा नामयातें । आस करुनि पाहात वास तुमची ॥१९॥