भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा

sakalanchi ichchha karitase purna | bhulala shrikrushna tyanchya bhava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा ॥१॥ विमानीं बैसोनी सुरवर पाहाती । गंधर्द गाताती सप्त-स्वरें ॥२॥ विणे वाजताती मृदंगाचे घोश । वाचे तो उल्हास वर्ण-वेना ॥३॥ न जाय चंद्रमा न जाती नक्षत्रें । पाहाती सर्वत्र रास-क्रीडा ॥४॥ जलक्रीडा करी लक्षुमीचा पती । लाळ घोटीताती देवस्रिया ॥५॥ धन्य त्या गोपिका धन्य त्यांचें पुण्य । भोगिताती कृष्ण पूर्णब्रह्म ॥६॥ नामा ह्मणे होय कामाची ते पूर्ती । नव्हे वीर्यच्युती गोविंदाची ॥७॥