भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळांचें तुझ्या हातें असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील

sakalanchen tujhya haten ase sutra | yashodecha putra na hoshil

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकळांचें तुझ्या हातें असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील ॥१॥ नंदाचिया ऋणा फेडाया आलासी । कळलें आम्हांसी तुझ्याकृपें ॥२॥ तेहेतीस कोटी देव ब्रह्मा सदाशीव । प्रार्थिताती सर्व तुजलागीं ॥३॥ यादवकुळटिळका वैकुंठनायका । विधीच्या जनका भेट आतां ॥४॥ नामा म्हणे मुख दावीं कृष्णनाथा । हरेल ही व्यथा वियोगाची ॥५॥