भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ वैभव निजकर्म भोग । ते तुज उद्वेग दावी काई

sakal vaibhav nijakarma bhog | te tuj udveg davi kai

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकळ वैभव निजकर्म भोग । ते तुज उद्वेग दावी काई ॥१॥ मीतूंपण असे तेथें मग कैचें । निर्माण ठायिंचें तोडीं वेल ॥२॥ आपुला करूनि ठेवीं तुझें पायीं । थोरपण कांहीं नको मज ॥३॥ नामा म्हणे तुझें सोलीन ढोंपर । कासया विचार देखों आतां ॥४॥