भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ संतजन देखोनि नयनीं । टाळिया पिटोनी गाता नाम

sakal santajan dekhoni nayanin | taliya pitoni gata nam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकळ संतजन देखोनि नयनीं । टाळिया पिटोनी गाता नाम ॥१॥ म्हणती धन्य भक्त निधडा वैष्णव । ब्रह्मादिकां माव न कळे याची ॥२॥ कैसा ऋणिया केला पंढरीनाथ । आहे सदोदित याचेजवळी ॥३॥ पूर्वी तो प्रल्हाद श्रवणीं ऐकिला । किंवा हा देखिला संतामधीं ॥४॥ नामा येऊनियां चरणासी लागला । ह्रदयीं आलिंगिला भक्तराज ॥५॥