भजनी मालिका
← भजनांकडे परत

सह्स्त्र दळांमधुन अनुहातध्वनि उठी । नामाचेनि गजरें पातकें रिघालीं कपाटीं

sahstra dalammadhun anuhatadhvani uthi | namacheni gajaren pataken righalin kapatin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सह्स्त्र दळांमधुन अनुहातध्वनि उठी । नामाचेनि गजरें पातकें रिघालीं कपाटीं ॥१॥ जागा रे गोपाळांनों रामनामीं जागा । कळिकाल एका नामें महादोष जाति भंगा ॥२॥ दशमी एक व्रत दिंडीचें करा दर्शन । एकादशी उपवास तुम्ही करा जागरण ॥३॥ द्वादशी साधनें जळती पातकांच्या कोटी । नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठीं ॥४॥