भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण तें ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणीं कष्ट होऊम नेदी

sagun ten brahma vitevari nit | konya pranin kashta houm nedi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सगुण तें ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणीं कष्ट होऊम नेदी ॥१॥ देऊनियां क्षेम देहू पालटिसी । वृद्ध रूप होसी कर्णसाठीं ॥२॥ भजन भक्तांचें मानिसी वचन । नाम नारायणा ह्मणे कांरे ॥३॥ उफराटी वदवी वाल्मिका नामाचा । शतकोटी संख्या प्रविस्तार ॥४॥ नामा ह्मणे देवा भक्तिचें पैं पिसें । त्यालागीं हव्यासें होसी जाण ॥५॥