भजनी मालिका
← भजनांकडे परत

सद्‌गुरुचे पाय जीवें न विसंबावे । मन वळवावेंज वृत्तिसहित

sad‌guruche pay jiven na visambave | man valavavenj vruttisahit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सद्‌गुरुचे पाय जीवें न विसंबावे । मन वळवावेंज वृत्तिसहित ॥१॥ डोळियाचे डोळे उघडिले जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥२॥ जन्ममरणाचें फेडिलें सांकडें । कैवल्यचि पुढें दाखविलें ॥३॥ मोहरले तरु पुष्पफळभारें । तेचि निर्विकार सनकादिक ॥४॥ नामा म्हणे स्वामी खेचर माउली । कृपेची साउली केली मज ॥५॥