भजनी मालिका
← भजनांकडे परत

सद्‌गुरु सागरा दीनबंधु । अनाथनाथा सुरैकसिंधु

sad‌guru sagara dinabandhu | anathanatha suraikasindhu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सद्‌गुरु सागरा दीनबंधु । अनाथनाथा सुरैकसिंधु । चातकातें कृषाबिंदु । प्रसाद द्यावा ॥१॥ गुरु आणि गणपति पुरातन । सिद्धांत वेदांत जुनाट जुना । दयाळा पातकहरणा । रक्षीं रक्षीं स्वामिया ॥२॥ तूं अंतरीचें जाणतां । तूं इच्छेचा दाता । तूं ह्रदयीं प्रेरक होता । कमळालया ॥३॥ दृश्यादृश्य करितां पार । चौर्‍यांशीं लक्ष योनी दुर्धर । चुकवूनि उतरसी पार । संकटीं स्वामिया ॥४॥ निवृत्ति प्रवृत्ति दोन्ही थडी । मधीं माया नदी उघडी । बोधभावें घालिसी सांगडी । पार उतरिसी सवामिया ॥५॥ सोपाना आपला अंकित । पद्महस्तें करावें मुक्त । जो मनें इच्छिला अर्थ । सिद्धि न्यावा स्वामिया ॥६॥