भजनी मालिका
← भजनांकडे परत

साडेतीन पाउलें टाकिलीं निश्चळ । नेमियेलें स्थळ उत्तरायणी

sadetin paulen takilin nishchal | nemiyelen sthal uttarayani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साडेतीन पाउलें टाकिलीं निश्चळ । नेमियेलें स्थळ उत्तरायणी ॥१॥ देव म्हणे ज्ञाना होई सावधान । माग वरदान मज कांहीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्वामीकडे ॥३॥ कृष्णपक्षीं व्रत हरिदिन परिपूर्ण । मागितला मान ज्ञानदेवें ॥४॥ नामा म्हणे देवा आवडीनें देतां । जोडलें हें संतां पियुष जें ॥५॥