भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुणझुण पायीं वाजताती वाळे । दावीं तीं पाउलें दयानिधी

runajhun payin vajatati vale | davin tin paulen dayanidhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रुणझुण पायीं वाजताती वाळे । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥१॥ जनक्र याचे घरीं चाळूनियां गेलें । दावीं तीं पा-उलें दयानिधी ॥२॥ गजा धरिलें नक्रें तेव्हां जे धांवले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥३॥ वस्त्रहरणीं ज्यातें द्रौपदीनें चिंतिलें । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥४॥ देखोनियां ज्यातें कौरव भ्याले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥५॥ धर्म आणि भीष्म विदुरादिक धाले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥६॥ स्वयंवराशी जातां शीळे उद्धरिलें । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥७॥ नामा म्हणे ज्यातें बळीनें पूजिलें । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥८॥