भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुक्माई म्हणे परियेसी वो आरजे । सांगेन सकळ जें वर्म तुज

rukmai mhane pariyesi vo araje | sangen sakal jen varma tuj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रुक्माई म्हणे परियेसी वो आरजे । सांगेन सकळ जें वर्म तुज ॥१॥ अनाथा माहेर एक चक्रपाणि । बहु दिनालागोनी लोभापर ॥२॥ म्हणोनि भुलला देव नाम्याचेनि लोभें । कर्मे शुभाशुभें अंगिकारी ॥३॥ आवडीचा वोरसु न करी कायकाय । हा प्रसिद्ध अनुभव आहे लोकां ॥४॥ विषम विषयसुख विषयाचेम गळालें । तयाचे सोहळे करिती लोक ॥५॥ आंधळे पांगुळे मुके अनर्गळ । परी जीवापरिस बाळ पढियें मातें ॥६॥ अंतरीच्या कळवळें खेळवी लाडेंकोडें । परि विलासाचे नावडे चोख चांग ॥७॥ प्रीतीच्या पडिभरेम नेघे पैम विकृती । देखोनि विश्रांति थोर मानी ॥८॥ म्हणे माझे आळीकर दिठावेल झणीं । इडापीडा घेउनी वदन चुंबी ॥९॥ स्नेहाच्या संभ्रमें नेणे लोकलाज । उचलोनि भुज घाली कंठीं ॥१०॥ तनुमनप्राणांची करुनी ओंवाळणी । जावें हें माझेनि म्हणे जीवें ॥११॥ तैसीच परी आहे या विठठलाच्या ठायीं । चित्त याच्या पायीं ठेविलें जेणें ॥१२॥ न पाहे तयाचें जाती कुळ कर्म । वर्णाश्रमधर्म शुद्ध वाणी ॥१३॥ अनंत जन्मांच कायामनेंवाचा । आहे या दोघांचा ऋणानुबंधौ ॥१४॥ तो नकळे न सुटे कोणिये कल्पांती । जिवलग सांगाती जाला नामा ॥१५॥