भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य । असावें आरोग्य चिरकाळ

rukmai aichen ahe aisen bhagya | asaven arogya chirakal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य । असावें आरोग्य चिरकाळ ॥१॥ सख्या पुंडलिका आवडतें स्थळ । असावें चिरकाळ स्वस्ति क्षेम ॥२॥ अहो संतजन घ्या आवडतें धन । असावें कल्याण चिरकाळ ॥३॥ जन्मोजन्मीं हेंचि मागें गोविंदासी । म्हणे जनी दासी नामयाची ॥४॥