भजनी मालिका
← भजनांकडे परत

रावणें हें केलें लग्नामाजी विघ्न । असे कीं स्मरण तुज-लागीं

ravanen hen kelen lagnamaji vighna | ase kin smaran tuj-lagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रावणें हें केलें लग्नामाजी विघ्न । असे कीं स्मरण तुज-लागीं ॥१॥ आणीरें धनुष्य मारीन रावणा । लंका बिभिषणा देईन मी ॥२॥ अंगद सुग्रीव्व जांबुवंत वीरा । हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥ टाकोनी पर्वत बुजवारे सागरा । पायवाट करा जाव-यासी ॥४॥ लंके पुढें मोठें माजवीन रण । तोडीन बंधन सुरवरांचें ॥५॥ विश्वामित्र याग नेईंन मी सिद्धी । मारीन कुबुद्धि दोघांजणां ॥६॥ खर दूषणांचा घेईन मी प्राण । धनुष्य मोडीन भुजाबळें ॥७॥ ध्याती मज त्याची बहुत आवडी । न विसंबें घडी त्याची एक ॥८॥ बोलिला वाल्मिक तैसोंचि करीन । वर्तोनि दावीन नामा ह्मणे ॥९॥