भजनी मालिका
← भजनांकडे परत

राष्ट्रं करी पाप राजानें भोगावें । राजियाचें तें सर्व पुरोहितां

rashtran kari pap rajanen bhogaven | rajiyachen ten sarva purohitan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राष्ट्रं करी पाप राजानें भोगावें । राजियाचें तें सर्व पुरोहितां ॥१॥ बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही । परी तें को-णाही न कळे वर्म ॥२॥ शिष्यें केलें पाप भोगावें गुरूनें । स्त्रिनें केलें घेणें पुरुषासी ॥३॥ नामा ह्मणे जन मायेंत गुंतले । सेखी खाती झोले संसाराचे ॥४॥