भजनी मालिका
← भजनांकडे परत

रमेच्या वल्लभें देखियेलें कंसा । धरोनी आवेशा बैसलासे

ramechya vallabhen dekhiyelen kansa | dharoni avesha baisalase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रमेच्या वल्लभें देखियेलें कंसा । धरोनी आवेशा बैसलासे ॥१॥ त्वरें जाऊनियां धरीयेला केशीं । पाडियेला भूमिसी दुष्टबुद्धी ॥२॥ वज्रपाय मुष्टी वोपी नारायण । सांडि-येला प्राण कंसें तेव्हां ॥३॥ देव वर्षताती सुमनाचे भार । भक्त जयजयकार गर्जताती ॥४॥ गार्‍हाणीं सांगती ऋषिमुनी सर्व । याताती गंधर्व सप्तस्वरें ॥५॥ नामा म्हणे पुढें अप्सरा नाचती । वर्णिताती कीर्ति कृष्णजीची ॥६॥