भजनी मालिका
← भजनांकडे परत

रमासिंधुमाजी सौंदर्याची धणी । ब्रीदें चक्रपाणि मिरविती

ramasindhumaji saundaryachi dhani | briden chakrapani miraviti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रमासिंधुमाजी सौंदर्याची धणी । ब्रीदें चक्रपाणि मिरविती ॥१॥ मेघदेहाकृति घनःश्याम मूर्ति । नटतसे भक्तीं भक्तजना ॥२॥ भाक देऊनियां गौळियाचे घरीं । गाई निरंतरीं चारितसे ॥३॥ इंद्र वेडावला मुनि थोर थोर । न कळेचि पार नामा म्हणे ॥४॥