भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामभक्तीविण अणु नाही सार

ramabhaktivin anu nahi sar

रचनाकार: संत रामदास · अभंग
रामभक्तीविण अणु नाही सार। साराचेंहि सार रामनाम कल्पनाविस्तार होतसे संहारु । आम्हा कल्पतरु चाड नाहीं कामनेलागुनी विटलासे मनु । तेथें कामधेनु कोण काज चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं। तेथें चिंतामणी कोण पुसे रामदास म्हणे रामभक्तीविणें। जाणावें हें उणें सर्वकांही।