भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामा तुझ्या स्वामीपणे

rama tujhya svamipane

रचनाकार: संत रामदास · अभंग
रामा तुझ्या स्वामीपणे । मानी ब्रह्मांड ठेंगणें तुजविण कोण जाणे । अंतर आमुचें तुजविण मज माया। नाहीं नाहीं रामराया आम्हां अनाथां कासयां । उपेक्षिसी तुज समुदाय दासांचा । परि आम्हां स्वामी कैंचा तुजसाठीं जिवलगाचा । संग सोडिला सगुण रघुनाथ मुद्दल । माझें हेंचि भांडवल ।