भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम अयोध्येचा वासी । तोचि नांदे द्वारकेसी

ram ayodhyecha vasi | tochi nande dvarakesi

रचनाकार: संत रामदास · अभंग
राम अयोध्येचा वासी । तोचि नांदे द्वारकेसी ।। कृष्ण नामातें धरिलें । बहु दैत्य संहारिँलें ।। सखया मारुतीलागुनी । रूप दावी चापपाणी ।। पुढे भूभार उतरिँला । पांडवासी सहाय जाला ।। आतां भक्तांचियासाठी । उभा चंद्रभागेतटी ।। राम तोचि विठ्ठल जाला । रामदासासी भेटला ।।