भजनी मालिका
← भजनांकडे परत

रक्तवर्ण त्रिकुट स्नान । श्रीहाट पाहे श्वेतवर्ण

raktavarna trikut snan | shrihat pahe shvetavarna

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रक्तवर्ण त्रिकुट स्नान । श्रीहाट पाहे श्वेतवर्ण ॥१॥ शामवर्ण तें गोलाट । निळबिंदु औट पीट ॥२॥ वरि भ्रमर गुंफा पाहे । दशमद्वारीं गुरु आहे ॥३॥ नव द्वारातें भेदुनी । दशमद्वारीं गेली जनी ॥४॥