भजनी मालिका
← भजनांकडे परत

रकार मकार बांधी कां रे तुळीं । तापत्रय होळी होऊनि जाय

rakar makar bandhi kan re tulin | tapatray holi houni jay

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रकार मकार बांधी कां रे तुळीं । तापत्रय होळी होऊनि जाय ॥१॥ गोविंद मुकुंद हरि परमानंद । कृष्ण केशव छंद नित्य वाचे ॥२॥ जपे जग्‌दबंधु हरिकथा छंदू । बिघडे भवबंधु येणें मात्रें ॥३॥ नामा म्हणे केशवा न करी निर्वाण । माझा अभिमान आहे त्यासी ॥४॥