भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजियाची कन्या नाम मिराबाई । विठोबाचे पायीं रत सदा

rajiyachi kanya nam mirabai | vithobache payin rat sada

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राजियाची कन्या नाम मिराबाई । विठोबाचे पायीं रत सदा ॥१॥ मायबाप तिचे करिती कृष्णसेवा । आवडीनें देवा पूजिताती ॥२॥ सवें मिराबाई जात असे नित्य । वेधलेंसे चित्त कृष्णपायीं ॥३॥ मिरा गुणवंती लावण्याची खाणी । आवडे ती मनीं मायबापां ॥४॥ म्हणती देवा इचा करावा सांभाळ । हांसे ते वेल्हाळ मिराबाई ॥५॥ मायबापें मज केलें कृष्णार्पण । हरुषलें मन फार तिचें ॥६॥ वरिला म्यां आतां द्वारकेचा नाथ । समाधान चित्त झालें माझें ॥७॥ आनंदानें करी देवाचें पूजन । नाचे उल्हासानें प्रेमें डोले ॥८॥ संत आणि साधु येती कीर्तनासी । आनंद मानसीं होय तिच्या ॥९॥ संतांचिया पायीं मिरा असे लीन । अहोरात्र ध्यान देवाजीचें ॥१०॥ समारंभ ऐसा होतां नित्यानित्य । आनंदभरित मायबाप ॥११॥ धन्य मिराबाई भक्तीची आवडी । लागलीसे गोडी देवाजीची ॥१२॥ सज्जन अंतरीं संतोष मानिती । निंदक निंदिती तिजलागीं ॥१३॥ राजियानें कन्या केखोनि उपवर । द्यावें इशीं घर करोनियां ॥१४॥ बोले मिराबाई ऐका तुम्ही ताता । वरिला म्यां आतां चक्रपाणी ॥१५॥ उभयतां तुम्हीं केलें कृष्णार्पण । तें कां हो स्मरण विसरले ॥१६॥ त्यानेम केआ असे माझा अंगिकार । नका पाहूं वर दुजा आतां ॥१७॥ देवाविण मज नावडे आणीक । मोठें आहे सुख देवापायीं ॥१८॥ फार गोडी त्यातें वर्णितांचि नये । बोलूं आतां काय एक मुखें ॥१९॥ तेव्हां मातापिता करिदी उत्तर । बौद्ध अवतार देव झाले ॥२०॥ नामीं रूपीं त्याच्या असों द्यावें चित । असे सर्व हित प्रपंचाचें ॥२१॥ ओळखूनि रूप करावा संसार । सर्व व्यवहार असे त्यचा ॥२२॥ ऐकोनियां ऐसें खहिताचे ठायीं । बोले मिराबाई पितयासी ॥२३॥ आधीं ज्यानें केलें अमृत प्राशन । नावडे त्या धुण कदाकाळीं ॥२४॥ मुंगिये लागली साखरेची गोडी । आवडीनें उडी घालीतसे ॥२५॥ राजहंस पक्षी मोतीयांचा चारा । आणिक इतरा न सेविती ॥२६॥ तैसा म्यां वरिला असे हा गोविंद । नका करूं शोध आणिकांचा ॥२७॥ हरि विणें कांहिं नेणें मी आणीक । सर्वही जनलोक माझे बाप ॥२८॥ तुम्ही म्हणा बौद्ध झाले चक्रपाणी । संशय हा मनीं न धरावा ॥२९॥ भाविकासी द्दश्य अभाविका बौद्धा । मोठा हा सावध नारायण ॥३०॥ लक्षस असे ज्याचें देवाजीचे पायीं । येऊनियां राही ह्रदयांत ॥३१॥ त्याचा सर्व धंदा करी चक्रपाणी । बोलिले पुराणीं व्यासादिक ॥३२॥ संशय चित्तांत नका धरूं आतां । सर्व हा जाणता पांडुरंग ॥३३॥ नाम्यासंगें जेवी आवडी हा जाणा । कैसें त्या म्हणा बौद्ध आतां ॥३४॥ एकनाथा घरीं बाहतसे पाणी । कैसा चक्रपाणी बौद्ध झाला ॥३५॥ कबीराचे मागीं विणितसे शेले । जाटाचें राखिलें शेत तेणें ॥३६॥ आणिकही कामें भक्तांघरीं करी । काय त्याची थोरी वर्णूं आतां ॥३७॥ राजा म्हणे मिरा समजली पूर्ण । परी जग दूषण ठेविताती ॥३८॥ म्हणोनियां त्यानें केली बंदोबस्ती । प्रवेश तो संतीं न होयची ॥३९॥ मिराबाई म्हणे अहो पांडुरंगा । कांहो संतसंगा अंतरलें ॥४०॥ संतांचे संगतीं आनंद सोहळा । दाखवाल डोळां केव्हां देवा ॥४१॥ कनवाळु मोठी सांवळी विठाई । नेई मिराबाई कीर्तनासी ॥४२॥ श्रुत झाली वार्ता तेव्हां राजियासी । जाते कीर्तनासी मिराबाई ॥४३॥ क्रोधावून नृप बोले त्या कांतेला । देईं विष प्याला निरालागीं ॥४४॥ लौकिकाची लाज सांडियेली तिणें । उपाय करणें हाचि आतां ॥४५॥ तेचि वेळीं प्याला भरोनियां विष । आली मंदिरास तेव्हां तिच्या ॥४६॥ येईं मिराबाई लाविलें दूषण । ऐसे सर्व जन बोलताती ॥४७॥ म्हणोनियां नृपें दिला विष प्याला । कुळासि लाविला डाग तुवां ॥४८॥ बोले मिराबाई सांवळ्या अनंता । तूं एक जाणता पांडूरंगा ॥४९॥ गेला तरी जावो सुखें माझा प्राण । निवारीं दूषण राजियाचें ॥५०॥ म्हणोनियां नृपें दिला विष याला । ही लाज तुजला देवराया ॥५१॥ मिरा त्यचे पाटीं झाली अपवित्र । बोलती सर्वत्नजग ऐसें ॥५२॥ कळेल हो तैशी राखीं याची लाज । वारंवार तुज काय सांगूं ॥५३॥ करूनियां तेव्हां कृष्णाचें चिंतन । प्याली आवडीनें विष प्याला ॥५४॥ नाहीं बाधा झाली तयाची ते वेळीं । मूर्ति झाली काळी देवाजीची ॥५५॥ येऊनियां नृपें विलोकिलें डोळां । आणिक सकळा जनानीं ते ॥५६॥ धन्य मिराबाई वंदिती चरण । जन्मलें निधान वंशामाजी ॥५७॥ मिरा वनमाळी नव्हेचि वेगळी । निश्चय सकळीं संतीं केला ॥५८॥ बोले मिराबाई अहो चक्रपाणी । कां तुझी जाचणी सोसितसां ॥५९॥ प्रेमें अश्रुनीर वाहे तिचे डोळां । माझा कळवळा तुम्हां आला ॥६०॥ सांवळे सकुमार गोजिरे चरण । इच्छितसे मन पहावया ॥६१॥ भकांची आवडी पुरवी केशव । पूर्ववत देव झाला तेव्हां ॥६२॥ निळी रेषा असे अद्याप ते कंठीं । देतां प्रीति मिठीं पाहती लोक ॥६३॥ धन्य मिराबाई धन्य तिची भक्ति । करिताती स्तुति साधुसंत ॥६४॥ संतांचा तो दास बोले शिंपिनामा । त्यानें दिला प्रेमा सदां मज ॥६५॥