भजनी मालिका
← भजनांकडे परत

राईयेवढें पांखरूं त्रिभुवनीं त्याचा फेरारे । नर आणि नारी तया पांखराचा चारारे

raiyevadhen pankharun tribhuvanin tyacha pherare | nar ani nari taya pankharacha charare

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राईयेवढें पांखरूं त्रिभुवनीं त्याचा फेरारे । नर आणि नारी तया पांखराचा चारारे । पिंडामध्यें आहे त्याचा शोध तुझी करारे । मेरूच्या शिखरीं त्या पांखराचा थारारे ॥१॥ येऊनि संसारा याचा अनुभव तुम्ही करारे ॥ध्रु०॥ चौर्‍यांशीं लक्ष योनी चुकेल जन्माचा फेरारे ॥ध्रु०॥ अठ्ठावीस योजने तया पांखराचा फेरारे । बत्तिसा मुखांनीं तें बा घेतसे चारारे । अहं सभेमध्यें ताचा शोध तुम्ही करारे । अकराही लोचन तया चोंची असती फाररे ॥२॥ एकवीस स्वर्गंहुनी तया पांखराची उंचीरे । सप्तहीं पाताळाखालीं तया पांखराची नीचीरे । नेत्रांतील बाहुली तया पांखराची निचीरे । उडालें पांखरूं सप्तही सागर घेऊन चोंचींरे ॥३॥ ऐसें तें पांखरूं दादा आहे सृष्टीवरीरे । मेरु आणि मांदार तया पांखराचे उदरींरे । शिवाचें आसन दादा कवणिये परीरे । पिंडीं आणि ब्रह्मांडीं म्हणती दशवे द्वारींरे ॥४॥ ऐसें तें पांखरूं गोरक्ष्ररायें वळखिलेंरे । पिंडीं आणि ब्रह्मांडीं मछिंद्रनाथें देखियेलेंरें । त्याचियेनीं अंगसंगें सद्रुरुनाथें दाखविलेंरे । त्याचियाचि प्रसादें नामा शिंप्यानें गाईलोंरे ॥५॥