भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहूं नका येथें जावें समुद्रासी । सांगे हर्षाकेशी सक-ळिकां

rahun naka yethen javen samudrasi | sange harshakeshi sak-likan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राहूं नका येथें जावें समुद्रासी । सांगे हर्षाकेशी सक-ळिकां ॥१॥ तुझिया मस्तकीं असे माझा चरण । न भक्षी तुज जाण पक्षीराज ॥२॥ दिव्य सुमनाच्या घालिताती माळा । पूजिती सांवळा बाप माझा ॥३॥ अनर्ध्य रत्नांचे देती अलंकार । श्रीमुख सुंदर पहाताती ॥४॥ जांबुनदातटीं घालिती भोजन । निघती तेथून सक-ळिक ॥५॥ आला भगवान आनंदले गडी । उभारिती गुढी जन तेव्हां ॥६॥ काळिया आख्यान स्मरे जो मानसीं । न डंखिती त्यासी सर्पकुळें ॥७॥ अहर्निशीं याचें करी जो पठण । नामा ह्मणे विघ्न नाहीं तेथें ॥८॥