भजनी मालिका
← भजनांकडे परत

राघवाचा धर्म गाजो

raghavacha dharma gajo

रचनाकार: संत रामदास · अभंग
राघवाचा धर्म गाजो। कीर्ति अद्भुत माजो ठाईं ठाईं देवालयें । भक्तमंडळी साजो शक्ति आहे तोचि फावे । दोनी लोक साधावे इहलोक परलोक । शत्रु सर्व रोधावे संसारिचें दु:ख मोठें । हें मी कोणाला सांगों जन्म गेला तुजविण । आणिक काय मी मागों मागता समर्थाचा । तेणें कोणा सांगावें रामेविण कोण दाता । कोणामागे लागावें रामदास म्हणे देवा । आतां पुरे संसार असंख्य देणे तुझें । काय देतील नर