भजनी मालिका
← भजनांकडे परत

राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तूं

radheprati anaya bole tayevelin | gharant ekali asasi tun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तूं ॥१॥ एकलें हें तुज कर्मेना मंदिरीं । खेळावया हरी आणीत जाईं ॥२॥ भ्रतार वचन राधेनें ऐकोनी । आनंद तो मनीं थोर तिच्या ॥३॥ स्वामी तुमची आज्ञा मजलागीं प्रमाण । म्हणोनी चरण वंदियेले ॥४॥ सुखशयनीं राधा भोगित अनंता । गोकुळांत वार्ता प्रगटली ॥५॥ राधेचिया घरीं थोर होतो हरी । गोकुळींच्या नारी गुजगुजती ॥६॥ यशोदे मातेसी सांगती सुंदरी । आवरीं मुरारी आपुला हा ॥७॥ तैसीच जाऊन राधेच्या गृहासी । सांगती सासूसी तिच्या तेव्हां ॥८॥ राधेलागीं वृद्धा म्हणे तयेवेळीं । घरासी वन-माळी आणूं नको ॥९॥ नामा म्हणे लोकीं पडियेली तुटी । तीसी जगजेठी अंतरला ॥१०॥