भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वीं तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मज-सवें

purvin tun anuj jhalasi kanishtha | soshiyele kashta maj-saven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्वीं तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मज-सवें ॥१॥ आतां तूं वडील होईंगा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बारे ॥२॥ देवकीउदरीं राहावें जावोनी । मायेसी मागूनि पाठवितों ॥३॥ योगमाया तुज काढील तेथून । घालील नेऊन गोकुळासी ॥४॥ लक्ष्मीशीं सांगे तेव्हां ह्लषिकेशी । कौंडण्यपुराशी जावें तुह्मीं ॥५॥ नामा म्हणे ऐसा करूनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥६॥