भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकें रचिली पेंठ । संत ग्राहिक चोखट

pundaliken rachili penth | sant grahik chokhat

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुंडलिकें रचिली पेंठ । संत ग्राहिक चोखट ॥१॥ प्रेम साखरा वांटिती । नेघे त्यांचे तोंडीं माती ॥२॥ समतेचे फ-णस गरे । आंबे पिकले पडिभरें ॥३॥ नामद्राक्षाचे घड । अपार रस आले गोड ॥४॥ नामा म्हणे भावें घ्यावें । अभक्तांचें मढें जावें ॥५॥